लॉक डाऊन काळात अबकारी खाते अधिक सक्रिय झाले असून गावठी दारू अड्ड्यावर धाड आणि चोरटी दारू विक्रेत्यांना त्यांनी लक्ष केले आहे.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 353 छापे टाकण्यात आले असून एकूण 37 गुन्हे दाखल करून 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 537 लिटरहुन अधिक हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून 25 दुचाकी जप्त केल्या आहेत.
एकूण सत्तावीस वाहने जप्त करण्यात आली असून 22 लाख रुपये चा साहित्य व दारूसाठा ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई म्हणजे अनेकांच्या उरात धडकी भरवणारी ठरले असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे अबकारी आयुक्त बसवराज यांनी सांगितले आहे.

लॉक डाऊन कालावधीत तळीराम दारूविना तळमळत आहेत.बार ,दारू दुकाने बंद असल्यामुळे चोरट्या दारूचा आणि गावठी दारूचा डिमांड वाढला आहे.लॉक डाऊनमुळे मागणी वाढल्यामुळे गावठी दारू विक्रेत्यांनी मात्र आपला व्यवसाय नेहमीपेक्षा अधिक जोरात ठेवला आहे. मोठ्या प्रमाणात दारू विक्रीवर कारवाई करण्याचा सपाटा सुरू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण भयभीत झाले आहेत.
अबकारी विभागाचे आयुक्त बसवराज यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सध्या कोरोनामुळे सर्वच ठिकाणी मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. मात्र याचे कोणतेही नियम न पाळता गावठी विक्रेते जोरदार दारू विक्री करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 357 ठिकाणी धाड टाकण्यात आली असून मद्य साठाही मोठ्याप्रमाणात जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.