संपूर्ण देशात लॉक डाऊन आहे. या परिस्थितीत अनेक जण घराबाहेर पडण्यास धजत नाहीत. मात्र काही उचापति लोक बाहेर पडून पोलिसांना व इतरांना त्रास देण्यात धन्यता मानू लागले आहेत. नुकतीच बेळगाव शहरात लॉक डाऊन असले तरी वाहतूक कोंडी दिसून आली. त्यामुळे अनेक आतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव शहरात पूर्व भागातून प्रवेश करणाऱ्या सम्राट अशोक चौक येथे वाहतूक कोंडीची समस्या जाणवली. यावेळी अशोक चौक परिसरात सर्वत्र बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र मोजकाच रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. याठिकाणी एकदमच वाहने आल्याने वाहतूक कोंडी झाली. याकडे जरा पोलिसांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोरोणाच्या धास्तीमुळे अनेक जण घराबाहेर पडत नाहीत. तरी अनेकांच्या उचापती मात्र सुरूच आहेत. बेळगाव शहरात मागील आठ ते दहा दिवसापासून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली नव्हती. कारण लॉक डाऊनमुळे घरी बसण्यात अनेकांनी धन्यता मानली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही. मात्र गुरुवारी सम्राट अशोक चौक येथे वाहतुकीची कोंडी दिसून आली.
सम्राट अशोक चौक परिसरात सदैव वाहतुकीची वर्दळ सुरू असते. त्यामुळे हा चौक गजबजलेला असतो. मात्र लॉक डाऊन असल्यामुळे विश्रांती घेतलेल्या चौकाने गुरुवारी पुन्हा कोंडीची समस्या उद्भवली. त्यामुळे आता वाहतूक कोंडी झाली अशी अनेकांना अफवा वाटू लागल्याचे दिसून येत आहे. मात्र सम्राट अशोक चौक येथे काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी दिसून आली.