लॉक डाऊनच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणारी 21 वाहने बेळगाव शहर पोलिसांनी मंगळवारी जप्त केली असून त्यांच्या मालकांना नोटीस बजावली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशव्यापी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लॉक डाऊनच्या काळात कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, वाहनावरून विनाकारण रस्त्यांवर फिरू नये असा आदेश काढण्यात आला आहे.
तथापि बेळगाव शहरवासियांकडून या आदेशाकडे अद्यापही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. याची गंभीर दखल घेऊन जळगाव शहर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त करण्याची मोहीम उघडली आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी रस्त्यावर विनाकारण फिरणारी 21 वाहने जप्त करून त्यांच्या मालकांना नोटीस बजावण्यात आली. लॉक डाऊनमुळे सध्या न्यायालये बंद आहेत. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकांना त्यांची वाहने आता न्यायालये सुरू झाल्यानंतरच परत मिळणार आहेत.