कोरोनाला रोखण्यासाठी आता पोलीस खात्याने कंबर कसली असून पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला.शुक्रवारपासून लॉक डाऊनची अमलबजावणी कठोरपणे करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीची वाहने जप्त करून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा .रस्त्यावर कोणीही दिसता कामा नये असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्यावर देखील दडपण आले आहे.कोरोनाला आवर घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस खाते यांनी लॉक डाऊन अधिक कडक करण्याचा निश्चय केला आहे.
रविवार पेठेत देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.त्यामुळे शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा आदेश व्यापाऱ्यांना देण्यात आला आहे.दोन दिवस शहरातील औषध आणि दूध विक्री केंद्रे सुरू राहणार असून अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश आहे.नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव पोलीस शुक्रवारी आणि शनिवारी घरा बाहेर पडलेल्याना आपल्या लाठीचा प्रसाद देणार हे निश्चित आहे पोजीटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेळगाव रेड झोन मध्ये असताना हॉट स्पॉट जिल्हा असताना पोलिसांनी देखील कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.गुरुवारी रात्रीच मार्केट पोलिसांनी रविवारनपेठ व्यापाऱ्यांना दोन दिवस मेडिकल आणि दूध वगळता कुणीच दुकाने सुरू करू नयेत असे बजावले आहे.हॉटेल मधील पार्सल सुविधा असोत शहरातील सर्व किराणा दुकान असोत सर्व बंद असणार केवळ मेडिकल शॉप सुरू असणार आहेत. बिग बाजार रिलायन्स फ्रेश सारखे सुपर मार्केट देखील बंद असणार असल्याची माहिती आहे.