कडोली ग्रामपंचायत मध्ये मोठा निर्णय बेळगाव लाईव्ह ची घेतली दखल

0
2350
Kadoli
Kadoli
 belgaum

कडोली परिसरात ग्राहकांची लुबाडणूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले होते. याबाबत ग्रामपंचायत तातडीने लक्ष देऊन संबंधितांना ताकीद द्यावी अशी मागणी जोर धरू लागली होती. कडोली ग्रामपंचायतीने दुकानदारांची बैठक घेऊन अधिक दर आकारू नये, असे आवाहण करण्यात आले आहे. याच बरोबर कोणीही वेळेहून अधिक दुकान चालू ठेवल्यास त्याचा दुकान चलविण्याचा परवाना रद्द करण्यात येईल असेही सांगण्यात आले. बेळगाव ला येणे याबद्दल सविस्तर माहिती दिली होती ये याची दखल घेत ग्रामपंचायतीने हा मोठा निर्णय घेतला आहे हे

कडोली ग्रामपंचायत मध्ये व्यक्तीत झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे दुकानदारांनी सकाळी सात 30 ते अकरा वाजेपर्यंत आपली दुकाने सुरू ठेवावीत जर यावेळी हून अधिक दुकाने सुरू ठेवल्या त्यांचा दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. कोणताही दर निश्चित न करता वितरण करण्यास मुभा दिल्याचे दिसून येते त्यामुळे अनेकांची गोची झाली असून याबाबत तातडीने लक्ष घालून योग्य तर ग्राहकांना द्यावा अशी मागणी होत होती. याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉक डाऊन असल्यामुळे अनेकांची मोठी गोची झाली आहे. साहित्य खरेदी करण्यापासून ते दुधा पर्यंत मोठ्या येरझाऱ्या माराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत दुकानदारांनी मात्र ग्राहकांची लूट करण्यात सुरुवात केली होती. या बाबत बेळगाव लाईव्हने वृत्त प्रसिद्ध केले होते. याचा विचार करून ग्रामपंचायतीने बैठक बोलावली होती या बैठकीत योग्य निर्णय घेण्यात आले आहेत.

 belgaum

कडोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या दुकानदारांना साहित्याचे दर वाढवू नये अशी आशा व्यक्त होत होती. याबाबत ग्रामपंचायतीने एक पत्रक काढून त्यांना समजून घेणे गरजेचे होते, अशी मागणी होते मात्र ग्रामपंचायतीने थेट बैठक बोलावण्यात दुकानदारांना दर वाढवण्याचा सल्ला दिला आहे याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत अनेकांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

केशकर्तनाल दुकानदारांनी मांडल्या व्यथा

लॉक डाऊन सुरू असल्यामुळे केस कर्तनालय दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र उदरनिर्वाहासाठी दुकाने सुरु ठेवण्याचा आदेश द्यावा अशी मागणी बैठकीत व्यक्त करण्यात आली. मात्र याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगण्यात आले.

यावेळी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, ग्राम पंचायत अध्यक्षा मनीषा पाटील, सागर पाटील, संतोष पाटील, नारायण पाटील, महादेव बिर्जे, संदीप पाटील, प्रदीप मरगाळे, नागेंद्र दाटेकर यांच्यासह गावातील इतर दुकानदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.