कोरोनामुळे संपूर्ण देश भयभीत झाले असताना आणि देशात लॉक डाऊन सुरू असताना दुसरीकडे बेळगाव जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत असून याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे बनले आहे.
संपूर्ण देशात लॉकडाउन झाले आहे. मात्र दुसरीकडे शिक्षकांना बापू जगजीवनराम जयंती शाळेत साजरी करावी असा फतवा शिक्षणाधिकाऱ्यांनी काढल्याने अनेक शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. सध्या या झुंजत असलेल्या देशवासीयांचा विचार सोडून आणि बाबू जगजीवनराम समिती यांनीदेखील ही जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी मात्र अनेकांना त्रास करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
बापू जगजीवन राम यांचे काम मोठे आहे. हे साऱ्यांना ज्ञात आहे. मात्र सध्या देश ज्या परिस्थितीतून जात आहे अशा परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण असताना आणि संपूर्ण देशात लॉकलाकडं असताना जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी मात्र आपल्या अकलेचे तारे तोडण्यास सुरुवात केली आहे. सर्व शाळांमध्ये बापू जगजीवनराम जयंती साजरी करा असा फतवा काढल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक आतून संताप व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी संपूर्ण शिक्षकांना बाबू जगजीवनराम जयंती साजरी करण्याचा आदेश दिला असून तसे करणे सक्तीचे केले आहे याबाबत नुकत्याच झालेल्या एका जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत बाबू जगजीवनराम जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय समाज बांधवांनी घेतला होता. मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतःची अक्कल लढवत बापू जगजीवन राम जयंती शाळांमध्ये सक्तीने साजरी करण्याचा आदेश दिल्याची माहिती आहे. याकडे आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. जर शाळेमध्ये शिक्षक एकत्र आले असतील तर लॉक डाऊन कशासाठी असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.