लॉक डाऊन मुळे तळीरामांचे घसे कोरडे पडले आहेत.अनेक तळीरामानी पालकमंत्र्यांना फोन करून मद्य दुकाने सुरू करा म्हणून भंडावून सोडले आहे.आता लॉक डाऊन कालावधी वाढला आहे.रुग्ण संख्याही वाढली आहे.त्यामुळे तळीरामांचे मद्य प्राशन करून घसे ओले होण्याची शक्यता तूर्तास मावळली आहे.पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी सरकारी विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीत सरकारी मद्य दुकाने देखील सुरू केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे तळीरामांची घोर निराशा झाली आहे.
कोरोना रुग्णाची संख्या आता 17 झाल्यामुळे शेट्टर यांनी लॉक डाऊनची कडक अमलबजावणी करा.कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित करा.दिल्लीला जावून आलेल्या ताबालिगिनी स्वतःहून पुढे येऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी.रायबाग तालुक्यातील कुडची गावातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करा अशीही सूचना शेट्टर यांनी केली.बैठकीला मंत्री सुरेश अंगडी,डॉ प्रभाकर कोरे,आमदार अनिल बेनके, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह लोक प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.