राज्यभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या विविध क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने दि.19 एप्रिल रोजी आदेश बजावला आहे.
लॉक डाऊन नंतर कर्नाटकात अनेक ठिकाणी कामगार,शेतमजूर अडकून पडले आहेत.त्यामुळे शेती आणि महत्वाच्या प्रकल्पचया कामांना खीळ बसली आहे.हा आदेश फक्त राज्यातच प्रवास करण्यापूरता लागू आहे.परराज्यात जावू इच्छिणाऱ्यांना हा आदेश लागू नाही.केवळ राज्यातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अडकून पडलेल्या कामगारांना जाता येईल.
या कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी आदेशाप्रमाणे व्यवस्था करा असे पत्र राज्याचे मुख्य सचिव विजयभास्कर यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.या कामगारांच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था करावी.बसमध्ये केवळ चाळीस टक्के प्रवासी बसवण्याची व्यवस्था करावी.चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक व्यक्ती बसमध्ये घेऊ नयेत अशी सूचनाही पत्रात करण्यात आली आहे.