कोरोना पॉजीटिव्ह रुग्णांचे नाव आणि मोबाईल नंबर सोशल नेटवर्कवर व्हायरल झाले असून त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
एपीडिमिक कायद्यानुसार रुग्णाचा तपशील जाहीर करणे हा गुन्हा असून त्याच्या जगण्याच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे.त्यामुळे ही माहिती कोणी सोशल नेट वर्कवर व्हायरल केली याची चौकशी केली जाणार आहे .आज सकाळी आरोग्य खात्याचे बुलेटिन अधिकृत प्रकट होण्या अगोदरच बुलेटिन आणि रुग्णांची माहिती व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सोशल नेटवर्कवर रुग्णाची माहिती कोणी व्हायरल केली याचा तपास केला जाणार आहे.ही माहिती प्रयोगशाळेतूनच कोणीतरी व्हायरल केली असण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्याचा तपास करण्यात येईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी व्यक्त केली आहे.
बेळगावात गुरुवारी 14 नवे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आकडा 69 झाला आहे ब्रेकिंग न्यूजच्या स्पर्धेत अनेकजण सोशल मीडियावर माहिती प्रसिद्ध करत आहेत अश्यावर कारवाई केली जाणार आहे.