रहदारी पोलिसांसह हायवे मोबाईल्स आणि इंटरसेप्टर्सनी मालवाहतूक भाजीपाला वाहतूक आणि जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करणारे वाहने अडवू नयेत, असा सक्त आदेश बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महा निरीक्षक राघवेंद्र सुहास यांनी यांनी दिला आहे.
लॉक डाऊनमुळे सर्वच मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तथापि आता जिल्हा, राज्य व देशांतर्गत जीवनावश्यक वस्तूंसह इतर सर्व मालवाहतूक गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मालवाहतूक बंद असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊन नागरिकांची मोठे गैरसोय झाली होती. त्यामुळे रहदारी पोलिसांसह हायवे मोबाईल्स आणि इंटरसेप्टर्सनी मालवाहतूक भाजीपाला वाहतूक आणि जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करणारे वाहने अजिबात अडवू नयेत, असा सक्त आदेश बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महासंचालकांनी दिला आहे. ही वेळ परमिट अथवा रेकॉर्ड तपासण्याची वेळ नाही. जिल्हा आणि आंतरराज्य माल वाहतूक सुरळीत होणे हे सध्या महत्त्वाचे आहे, असेही ही पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.