हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका वारंवार शेतकर्यांना बसत आहे. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असून नुकसान भरपाई देण्याकडे ही त्यांनी साफ मनाई केल्याचे दिसून येत आहे. नुकतीच गौंडवाड येथे एका गवत गंजीला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र ही नुकसानभरपाई हेस्कॉम देणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
शिवाजी गल्ली गौडवाड येथील मल्लाप्पा नारायण पाटील यांच्या गवत गंजीला आग लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पावसाळ्यापूर्वी जनावरांना चारा साठवून ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या शेतामधून एका बैलगाडीतून गवत आणत असताना ही आग लागली आहे. हेस्कॉमच्या कारभारामुळे आग लागून चारा जळाला आहे. त्यामुळे जनावरांवर ही आता उपासमारीची वेळ आली आहे. या घटनेत बैलांना आगीपासून वाचण्यात आले आहे सुदैवाने बैलांना कोणतीही झळ बसली नाही.
तालुक्यातील अनेक शिवारामध्ये लोंबकळणाऱ्या तारा आणि वाकलेले खांब दिसून येतात. शेतकऱ्यांकडून वारंवार दुरुस्ती करण्याची मागणी होते. मात्र याकडे हेस्कॉमने कानाडोळा करून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे गौडवाड येथील गवत गंजीला तारांचा स्पर्श होऊन आग लागली आहे. ग्रामस्थांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये गवत गंजी जळून खाक झाले आहे.
हेस्कॉमच्या खांबच्या वायरा लोंबकळत आहेत. त्यामुळे हेस्कॉमने ताबड़तोब दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
पवासाळ्यापूर्वी जनावरांचा चारा शेतातून आपल्या परसात गवत गंजी घालन्यासाठी मल्लाप्पा पाटील गवत घेऊन जात असताना वायर लागून आग लागली आहे. पावसात पुर आल्याने गवताची कमतरता आहे. गवताचा किंमत ही गगनाला पोहचली आहे. अशा परिस्थितीत गवत गंजी जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.