संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्यामुळे अनेक जण घराबाहेर पडण्यास घडत नाही. मात्र तळीरामांचे चोचले पुरवण्यासाठी अनेक जण बेकायदेशीर रीत्या दारू विक्री करत आहेत. अशीच बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्यांवर ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे. तर नागरिकांनी यावर निबंध घालण्यासाठी मदत केली आहे.
लॉक डाऊन असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदीचा आदेश देण्यात आला आहे. मात्र काही जण या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात धन्यता मानत आहेत. अशा परिस्थितीत मुचंडी ग्रामस्थांनी मात्र एक अभिनव उपक्रम राबवून दारूबंदी केली आहे.
मुचंडी गावात बेकायदेशीर रित्या दारू विक्री सुरू असल्याची माहिती ग्रामपंचायतीला मिळताच त्यांनी धडक कारवाई केली आहे. याबाबत काही तरुणांनी स्तुत्य उपक्रम राबवून दारूबंदीसाठी प्रयत्न केले आहेत. मुचंडी येथील काही तरुणांनी अग्रेसर होऊन दारू विक्री करणाऱ्याला चांगलेच खडसावले आहे. यापुढे दारू विक्री केल्यास गय केली जाणार नाही असा इशाराही तरुणांनी दिला आहे.
बाहेरगावावरून गावठी दारू आणून ही बेकायदेशीर रीत्या विकण्याचा प्रयत्न सुरू होता. गावातील काही तरुणांनी याबाबत ग्रामपंचायतीला सांगून त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. आणि ती वाहने मारिहाळ पोलीस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. याच बरोबर दारू विक्री करणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
बाहेरून दारू प्यायला येणा-या इसमाला गावातील नागरिकांनी दिला चोप दिला आहे. मुचंडी गावामध्ये दारू पिण्यास येणा-या प्रत्येक नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. या वेळी ग्रां पं अध्यक्ष अशोक मोदगेकर, पि डी ओ जयमाला, सदस्य विनोद कोळजीगौडा, संजय चौगुले, संदिप जक्काणे,सिद्धाप्पा काकतीकर, संतोष हुलकाई, बसू मोदगी, नारायण कोणो, सोमनाथ भंगारी, सुगंधा कुरगुंदी व गावातील नागरिक उपस्थित होते.