केंद्र सरकारच्या मानव संसाधन खात्यात संयुक्त सचिव म्हणून सेवा बजावत असलेले गिरीश होसुर यांची नियुक्ती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.
गिरीश होसुर हे मूळचे खानापूर तालुक्यातील बिडी गावचे आहेत.बेळगावात त्यांनी डीसीएफ म्हणून सेवा बजावली होती.ग्रीन सिटी योजने अंतर्गत शहर ,परिसरात त्यांनी पन्नास हजार झाडे लावण्याची मोहीम यशस्वीरीत्या राबवली होती.
जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी पाणवठे निर्माण केले होते.केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागात संयुक्त सचिव म्हणून सेवा बजावताना देखील त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे त्यांना केंद्राचा पुरस्कारही लाभला आहे.
होसूर हे मूळचे खानापूर तालुक्यातील बिडी गावचे आहेत त्यांची मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या सचिव पदी नियुक्ती झाली आहे.मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव बेळगावचेच भाजप नेते शंकरगौडा पाटील आहेत आता बेळगावचेच गिरीश होसुर हे अधिकारी सचिव बनल्यामूळे येडीयुरप्पा यांच्या अवती भवती बेळगाव असणार हे निश्चित आहे. गिरीश होसुर यांनी या अगोदर बेळगाव वन विभागात डी एफ ओ म्हणून सेवा बजावली होती.
K