कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या लाॅक डाऊनमुळे प्रामुख्याने गर्भवती महिला आणि मोठ्या संख्येने अत्यवस्थ रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलने पुढाकार घेऊन बेळगाव शहरासाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे.
लॉक डाऊनच्या काळात शहर हद्दीतील ज्या रुग्णांसाठी तातडीने अॅम्ब्युलन्स सेवा हवी असेल त्यांच्या नातेवाईकांनी 0831 – 25551144 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक आणि इतर आजारी सर्वसामान्य नागरिक ज्यांना दुकानात जाणे शक्य नाही. अशा लोकांनी आपली औषधे घरपोच मिळण्यासाठी 7996705501 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल मधील “फ्यू क्लीनिक” दररोज 24 तास सुरू आहे. तेंव्हा सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ताप अथवा फ्लूची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी तात्काळ या क्लिनिकमध्ये येऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी केले आहे.