हब्बनहट्टी (ता. खानापूर) गावानजीक शनिवारी रस्त्याशेजारी सापडलेल्या “त्या” दोन 500 रुपयांच्या नोटा मोबाईल शर्टाच्या खिशातून काढताना नकळत रस्त्यावर पडल्या होत्या, असे उघडकीस आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने धास्तावलेल्या हब्बनहट्टी गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे
हब्बनहट्टी गावानजीक शनिवारी रस्त्याशेजारी सापडलेल्या “त्या” दोन 500 रुपयांच्या नोटा बैलुर कृषी पत्तीनच्या एका संचालकाच्या आहेत. सदर संचालक हे बैलूरहून जांबोटीला बँकेच्या कामासाठी आपल्या दुचाकीवरुन निघाले होते. हब्बनहट्टी दरम्यान त्यांना एक मोबाईल कॉल आल्यामुळे शर्टाच्या खिशातील मोबाईल काढत असताना नकळत 500 रुपयाच्या दोन नोटा खिशातून उडून रस्त्यावर पडल्या.
मोबाईल खिशातून काढताना आपल्या खिशातील 500 रुपयांच्या नोटा रस्त्यावर पडल्याचा हा प्रकार बैलुर कृषी पत्तीनच्या संचालकांना घरी गेल्यावर लक्षात आला. मात्र तोपर्यंत हबनहट्टी येथे घबराट पसरण्याबरोबरच पोलीस येऊन नोटा सॅनीटाईझ करून ताब्यात घेण्यापर्यंतचे महाभारत शनिवारी घडले होते.