लॉक डाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करण्यासाठी आयलाईन पिक्चर्स या बेळगावच्या फिल्म प्रोडक्शन हाऊसने “आयलाईन रेडिओ” हा स्तुत्य उपक्रम सुरू केला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आयलीन पिक्चर्स हे बेळगाव आधारित फिल्म प्रोडक्शन हाऊस आहे. संकेत कुलकर्णी आणि श्वेत प्रिया यांनी या प्रोडक्शन हाऊसची
सुरुवात केली आहे. “आयलाईन रेडिओ” हा आयलाईन पिक्चर्सचा एक उपक्रम आहे. आयलीन रेडिओ हा लघु कथा सांगणे, काव्य पठण, पॉडकास्ट इत्यादींसाठी एक छोटा ऑडिओ प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर करून ऑडिओ कथांद्वारे कोणीही त्यांचे अनुभव सांगु शकतो हे विशेष होय.
सध्याच्या लाॅकडाऊन कालावधीचा सदुपयोग करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लोक डाऊननंतर देखील हा उपक्रम सुरूच राहणार आहे. अभिजीत देशपांडे हे आयलाइन रेडिओचे सदस्य आहेत. “आयलाइन रेडिओ” हे फक्त एक नाव आहे, याच्याशी कोणत्याही रेडिओ फ्रिक्वेन्सीचा कांहीही संबंध नाही, असे संकेत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.