Saturday, December 21, 2024

/

सर्वच सेवा…. अत्यावश्यक कश्या??

 belgaum

बेळगाव लॉक डाऊनवर पोलीस प्रशासनाची पकड ढिली पडली आहे का?असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे की काय याबत जनतेत चर्चा सुरू झाली आहे. अनेकजन आपापल्या गाडीला अत्यावश्यक सेवेचे फलक लावून किंवा पोलिसांकडून मिळालेले पास गळ्यात अडकवून बेळगावभर मिरवत आहेत.यांच्या सेवा खरंच अत्यावश्यक सदरात मोडतात का? हे तपासून पहाण्याची गरज आहे.

शहरातील रस्त्यारस्त्यावर फळ विक्रीच्या गाड्या सुरू करून राजरोस विक्रीचा बाजार मांडला गेला आहे. इतक्या फळ विक्रीच्या गाड्यांची लॉक डाउन काळात गरज आहे का?या फळ विक्रेत्याकडे पाहिलं असता प्रचंड अस्वच्छता दिसून येते आणि ते सामाजिक डिस्टन्स पाळत नाहीत किंबहुना या फळ विक्रेत्यांच्या आरोग्याची पहिल्यांदा तपासणी करण्याची गरज आहे.

बेळगावतील संशयित कोरोना रुग्णांची वाढती संख्या पहाता नीटपणे लॉक डाउनची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. आरोग्य खात्याने संबंधित फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांची कसून चौकशी करणे गरजेचे आहे.ते ग्लोव्हज मास्क वापरतात की नाही ह्याची पण तपासणी करून तसे आरोग्य सर्टिफिकेट देणे गरजेचे आहे.प्रशासन एका बाजुला उत्कृष्ट कार्य करत असताना काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा माजुरीपणामुळे अख्ख गाव वेठीस धरण्याची शक्यता आहे.काही फळ विक्रेते निझामुद्दीन रिटर्न तबालिगी लोकांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच शासनाने योग्य पावले उचलावी अशी मागणी होत आहे.

काही व्यापाऱ्यांनी आणि कारखानादारांनी आपल्या ओळखीचा फायदा घेत कामगारांचा पगार करण्यासाठी म्हणून अधिकचे पास मिळवले आहेत. त्याचा गैरवापर शहरा बाहेर पार्ट्या करण्यासाठी जाणे व शहरातील ओस रस्त्यावर आलिशान गाड्यातुन मिरवण्यासाठी करत आहेत. त्यासाठी दिलेले पास वैध मार्गाने वापरले जातात का?हे तपासणे गरजेचे आहे. या शिवाय प्रामाणिक काम करणारे वगळता बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना अल्पोपहार वाटून चमगोरी करण्यासाठी गर्दी करणाऱ्याना देखील चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे, तरचं हा लॉक डाउन यशस्वी होईल.

बेळगाव शहरात अद्याप एकही कोरोनाचा पोजीटिव्ह रुग्ण नाही मात्र असं जर का लॉक डाउनचं उल्लंघन झालं तर कोरोना मुक्त बेळगावची कीर्ती कायम राखण्यात अडचण निर्माण होईल. यासाठी जनतेने, प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करणे जरुरी आहे त्याच बरोबर त्यांनी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमल बजावणी करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.