मागील दोन-तीन दिवसांपूर्वी पासून बेळगावकरांना दिलासादायक बाब मिळाली होती. कोरोना निगेटिव्ह रुग्ण आढळल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र आता शनिवारी पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. हिरेबागेवाडी गावांमध्ये आणखी नऊ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बेळगावकरांमध्ये पुन्हा धास्ती लागून राहिली आहे.
शनिवारी सायंकाळी बेळगाव जिल्ह्यात आणखी तीन रुग्णांची भर पडली. हा आकडा 54 वर पोहचला आहे. हिरेबागेवाडी येथील आणखी तिघे कोरोना बाधीत असून 8 वर्षीय बालक व 20 वर्षीय युवक तर 30 वर्षीय महिलेसह कोरोना झाला आहे. पोजीटिव्ह-पी 128 या दिल्ली रिटर्न कडून आलेल्या दुय्यम संपर्कातून लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्याच्या संपर्कात आलेले हिरेबागेवाडीत 9 रुग्ण वाढले असून फक्त हिरेबागेवाडी येथील रुग्णांचा आकडा 23 वर पोहचला आहे. राज्यातील बधितांची संख्या 500 संख्या झाली आहे.
शनिवारी सकाळच्या राज्य सरकारच्या न्यूज बुलेटीनमध्ये सहा जन हिरे बागेवाडीचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर सायंकाळी पाचच्या बुलेटीन न्युज मध्ये आणखी तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. रुग्णांची संख्या आता 54 वर जाऊन पोचली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संकट टळत असतानाच पुन्हा जोमाने उभे राहिल्याचे दिसून येत आहे.
बेळगावात हिरे बागेवाडी येथील एका 80 वृद्धेचा मृत्यू झाला होता तर चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे बेळगावकरांना दिलासादायक बाब वाटत होती. मात्र पुन्हा शनिवारी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. याबाबतीत आरोग्य खातेही त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत बेळगावकरांना दिलासादायक बाब मिळत असतानाच शनिवारी मात्र पुन्हा खळबळ माजली आहे. हिरे बागेवाडी येथील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. अजूनही काही अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आणखी किती जण पॉझिटिव्ह सापडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बेळगावात काही व्यवसायांना शिथिलता देण्यात आली होती. मात्र आता रुग्ण वाढल्याने पुन्हा त्यावर निर्बंध घालण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.