जिल्ह्यात कोरोनाची संख्या 36 वर पोहोचली असून अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच राज्य सरकारने दिलेल्या बुलेटीन मध्ये 17 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या सतराजना मधील एक 45 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांचे संख्या पंधरा वर जाऊन पोचले आहे.
संबंधित पी-295 ही महिला दिल्लीला जाऊन परत आली होती. या महिलेचा अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी तो अहवाल राज्य सरकारने प्रसिद्ध केला असून संबंधित महिला पॉझिटिव आढळली आहे. दुसऱ्यांदा या महिलेची तपासणी केली असता ते कोरोना पॉझिटिव आढळली आहे.
सध्या येळ्ळूर परिसरात महिलेच्या संपर्कात येणाऱ्यांचे तपासणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. तर बफर झोनमध्ये येळ्ळूर गावाचा समाविष्ट करण्यात येणारआहे. सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत गावाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोन आणि लॉक डाऊन करण्यात आले आहे. पोलिसांनी देखील गुरुवारी सकाळी येळ्ळूर ग्राम पंचायतीत बैठक घेतली असून गाव सील केले जाणार आहे ग्रामीण पोलीस येळ्ळूर मध्ये दाखल झाले असून गुरुवारी सायंकाळी पर्यन्त गाव कंटमेंट झोन केले जाणार आहे या शिवाय गावात येणारे सर्व दहा रस्ते सील करण्यासाठी ग्राम पंचायत सहकार्य करणार असल्याची माहिती ग्राम पंचायत सदस्यांनी दिली.
पी-295 ही महिला दिल्लीला गेली होती. त्यानंतर ती परत आल्यानंतर येळ्ळूर येथेच वास्तव्यास होती. त्यामुळे तिचे अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होत. आता तिचे अहवाल पॉझिटिव आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ग्रामस्थांनी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली असून येळ्ळूरसह तालुक्यात पंधरा जणांना तरुणाची लागण झाली आहे.
कॅम्प बेळगुंदी हिरेबागेवाडी पिरनवाडी नंतर आता येळ्ळूर देखील कंटेमेंट झोन होणार आहे.