कोरोना मुळे परिस्थिती भयानक आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचे काम पोलीस अधिकारी करत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
अशा पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचे काम बेळगाव शहराच्या डीसीपी सीमा लाटकर यांनी आपल्या ट्विट द्वारे केले आहे.
सर्व पोलिस अधिकाऱ्यां बद्दल आम्हाला अभिमान वाटतो सध्या ते दिवस आणि रात्र एक करून काम करत आहेत त्यांच्या चोवीस तास काम करण्याच्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. असे सीमा लाटकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर नागरिकांनाही आवाहन करताना खाकी तुमच्यासाठी आहे खाकीचा मान राखा असे आवाहनही केले आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पहिल्या दिवसापासून सर्व काही नियंत्रणात ठेवण्यासाठी राबत असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सीमा लाटकर यांचे नावही घेतले जाते. लाटकर यांनी पहिल्या दिवसापासून स्त्यावर उतरून काम सुरू केले आहे .अशा या वातावरणात आपल्या हाताखाली काम करणार्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचे काम या आयपीएस अधिकारी करत आहेत. याची सर्वत्र चर्चा आहे .
वेगवेगळ्या कारणांनी पोलिसांची प्रतिमा मलीन होत असते या परिस्थितीत मात्र बेळगाव पोलिसांनी दाखवलेली कामाची जबाबदारी कौतुक करण्यासारखेच आहे.
असे आहे डी सी पी लाटकर यांचे ट्विट
We take pride in our police officers. At this point of time they are performing beyond the call of their duty. "We won’t quit "
# Khaki is there for you, with you always
# Let’s fight it together. stay safe pic.twitter.com/8v6mB1WBKy— Seema Latkar IPS (@DCP_LO_Belagavi) April 27, 2020