सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दिल्ली येथील काही व्हिडिओमुळे मोठा गदारोळ माजला आहे. हे व्हिडिओ किती खरे किती खोटे हा पुढील भाग असला तरी सोशल मीडियावर काहींनी कोरोना लागण झालेल्या नोटा रस्त्यावर फेकून देन्याचे व्हिडिओ व्हायरल केल्याने मोठी भीती निर्माण झाली आहे. असाच प्रकाराचा बेळगाव येथेही दिसून आला आहे. रस्त्यावर पडलेल्या नोटामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्या नोटा जाळण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता बेळगावकरांना आता नोटांची धास्ती लागून राहिली आहे.
वडगाव परिसरात ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही तरुणांनी या नोटा जाळल्याचे उघडकीस आले आहे. शहर आणि परिसरात काही ठिकाणी चलनी नोटा टाकून नागरिकांना आकर्षित करून घेण्याचे प्रकार घडत आहेत. याचा विचार आता गांभीर्याने होण्याची गरज असून पोलिसांनी याकडे लक्ष देणे आवश्यक बनले आहे.
वडगाव येथील नाझर कॅम्प आणि महात्मा फुले रोड परिसरात या नोटा टाकण्यात आल्याची माहिती आहे. 100, 50 व 20 अशा या नोटा होत्या. यावेळी याच परिसरातील काही तरुणांनी ही बाब लक्षात घेऊन संबंधित त्या नोटा जाळल्या आहेत. ही बाब उघडकीस आल्यानंतर एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात खळबळ माजली आहे.
या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी बराच वेळ थां बून याकडे पाहिले. काही जणांनी नोटा उचलण्यासाठी प्रयत्नही चालविला होता. मात्र याबाबत जागरूक नागरिकांनी सूचना देऊन अशा नोटा उचलू नयेत असे आवाहन केले. त्यानंतर याबाबतची माहिती संबंधित पोलिसांना देण्यात आली आहे. अशा प्रकारे कोठेही नोटा पडलेल्या दिसल्यास त्या उचलू नये व त्या जाळाव्यात असे आव्हानही नागरिकांनी केले आहे.