सदलगा पोलीस स्थानकाच्या हद्दीत सी आर पी एफ कोब्रा कमांडोचा जवान सचिन सावंत या सीआरपीएफच्या अधिकाऱ्याला मारहाण करण्याबरोबरच बेड्या ठोकून पोलीस स्थानकात नेण्याची घटना घडली ती अतिशय दुर्दैवी असून याप्रकरणी निपक्षपाती चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कर्नाटकाचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांच्याकडे सीआरपीएफचे अधिकारी संजय अरोरा यांनी ही मागणी केली आहे.
सदलगा पोलीस स्टेशन हद्दीत 23 एप्रिल रोजी जी घटना घडली ती पूर्णपणे दुर्दैवी होती. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याचबरोबरीने सीआरपीएफचा जवानाला ही त्याच्या एकंदर प्रतिष्ठेचा विचार न करता वागणूक देण्यात आली.
या दोन्ही घटना दुर्दैवी आहेत. ते मास्क न घालता आपली गाडी धुवत होते त्यावेळी सेवे वरील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना छेडले असता त्यातून संघर्ष निर्माण झाला, अशावेळी अनवाणी पायाने त्यांना पोलीस स्थानकात नेण्यात आले आणि त्याठिकाणी बेड्या ठोकण्यात आल्या.ही घटना टाळता आली असती मात्र काही दुर्दैवी परिस्थितीमुळे असे झाले असून सीआरपीएफ आणि आणि कर्नाटक पोलिस यांच्या प्रतिष्ठेचा विचार करून या घटनेची गांभीर्याने चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या अगोदर जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी देखील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती हे प्रकरण केंद्रीय गृह मंत्रालया पर्यन्त पोहोचले आहे त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.