एकसंबा येथील सीआरपीएफचा कोब्रा कमांडो सचिन सावंत याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.दोन पोलिसांना सेवा बजावताना अडथळा केल्याबद्दल आणि मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी सचिन याला अटक करून गुन्हेगाराप्रमाणे पोलीस स्थानकात बेड्या घालून बसवले होते.
चिकोडीच्या पहिल्या जे एम एफ सी न्यायालयाने सचिन सावंत याला जामीन मंजूर केला आहे.जामीन मिळालेली कागदपत्रे घेऊन वकील चिकोडीहून बेळगावच्या हिंडलगा जेलला रवाना झाले आहेत.
दि23 एप्रिल रोजी एकसंबा येथे कोब्रा कमांडो सचिन सावंत याला मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारा प्रमाणे अनवाणी चालवत नेऊन पोलीस स्थानकात बेड्या घालून बसवले होते.त्यामुळे पोलीस खात्यावर टीकेची झोड उठली आहे.कारवाई केलेल्या पोलिसांची बाजू वरिष्ठ अधिकारी मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.
मंत्री रमेश जारकीहोळी यांनी देखील सचिन याची सन्मानाने मुक्तता करावी अशी मागणी केली आहे.सीआरपीएफच्या टॉप ब्रासने देखील चौकशीची मागणी केली आहे.अनेक संघटनांनी सचिन सावंत याना पाठिंबा देऊन मुक्तता करण्याची मागणी केली आहे.