कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या भागाला जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.तीन किलोमीटरचा भाग हा कंटेनमेंट झोन असणार आहे.त्यानंतरचा दोन किलोमीटर भाग हा बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.या भागात जाण्यासाठी कोणालाही परवानगी नसून त्या भागात राहणार्याना देखील बाहेर पडता येणार नाही.
कंटेनमेंट झोनमधील सगळ्यांना होम क्वांरंटाईन प्रमाणे घरातच राहावे लागणार आहे.घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.या भागातील अत्यावश्यक सेवेची दुकाने आणि औषध दुकाने देखील बंद ठेवण्यात येणार आहेत.
या भागातून कोणत्याही प्रकारचे वाहन नेण्यास देखील मनाई आहे.सकाळी आठ ते दहा या वेळेत कंटेनमेंट झोन मधील व्यक्ती आवश्यक वस्तुंची खरेदी सोशल डिस्टनसिंग पाळून करू शकतात.आरोग्य खात्याचे कर्मचारी या भागात जावून तपासणी करणार आहेत.
बेळगाव शहरातील कॅम्प ग्रामीण भागातील बेळगुंदी व हिरेबागेवाडी हे तीन भाग कंटेनमेंट झोन म्हणून म्हणून जाहीर झाले आहेत.