कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 3 मेपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या राज्यातील सर्व न्यायालयांचा बंदचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
नव्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयं, कौटुंबिक न्यायालयं, कामगार न्यायालय आणि औद्योगिक लवाद (इंडस्ट्रियल ट्रिब्युनल) येत्या शनिवार दि 16 मे 2020 पर्यंत बंद राहणार आहेत.
बेंगलोर उच्च न्यायालयाच्या सन्माननीय मुख्य न्यायाधीशांनी हा आदेश बजावला असल्याचे आज गुरुवारी राज्याचे रजिस्ट्रार जनरल राजेंद्र बदामीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविणे आहे.