संपूर्ण देशात लॉक डाऊन परिस्थिती आहे. अशाचही तळीरामांना आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अबकारी खातेही धाडसी कारवाया करून एक कोटीची दारू व इतर साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. नुकतीच एका पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
लॉकडाउन काळात अबकारी खात्याच्यावतीने जिल्हाभरात बेकायदा दारु विरोधात कारवाई सत्र सुरुच ठेवले आहे. आतायर्पत 794 धाडी टाकून मद्य, वाहने असा एकून 1 कोटी दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात दारू विकणाऱ्यामध्ये मोठी खळबळ माजली असून अनेकांना अटक करण्यात आली आहे.
लॉकडाउन काळात जिल्ह्यात मद्य विक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. या काळात गावठी दारु विक्री आणि तस्करी होण्याची शक्यत असल्याने अशा धंद्यात गुंतलेल्यावर कारवाई करण्यासाठी अबकारीच्या वतीने विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने विशेष परिश्रम घेऊन अनेकांना ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर वाहने दारू तयार करण्यात आलेले साहित्य साधी ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 24 मार्चपासून रात्रदिवस गस्त घालून वाहनांची तपासणी करत कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्हाभरात 794 धाडी टाकण्यात आल्या आहेत. 108 प्रकरणांची नोंद करुन घेउन 64 संशयिताना अटक करण्यात आली आहे. 46 लाख 62 हजार 695 लिटर मद्य , 95.900 लिटर गोवा बनावटीचे मद्य, 10.170 लिटर महाराष्ट्राचे मद्य, 1207.200 लिटर बयर, 53 लिटर सिंधी, 170 गुळाचे रसायन, 79.610 संत्रा, 93 लिटर काजु, 1714, 400 गावठी दारु, 50 किलो गुळ आणि 7. 400 वाईन जप्त करण्यात आले आहे. 79 दुचाकी, दोन ऑटो रिक्षा, दोन कार, चार मालवाहू वाहन, एक महेंद्रा पीकअप अशी एकून 52 लाख रुपये किमतीची 88 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर 1 कोटी दहा लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती अबकारी आयुक्त बसवराज यांनी कळविली आहे.