पोलीस म्हणजे भीती आणि त्यांच्यातील दबदबा यामुळे त्यांच्या जवळ जाण्यास देखील नागरिक घाबरत असतात. मात्र पोलिसही एक माणूस आहेत हे वारंवार दाखविण्यात आले आहे. अशीच घटना बेळगावचे घडली आहे. एका निराधार व्यक्तीला पोलिसांनी स्वतःचा जेवणाचा डबा देऊन मदत केल्याने खाकीतील पोलिसांनी दाखवलेली माणूस अभिनंदनास पात्र आहे.
वेंगुर्ला रोड विनायक नगर येथे एक निराधार व्यक्ती झोपला होता. तो मागील काही दिवसापासून तेथेच असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या मार्गावरून जाताना कॅम्प पोलिस स्थानकाचे एएसआय एस एम बांगी आणि होमगार्ड महेश यांनी त्या निराधार व्यक्तीला स्वतःकडील जेवणाचा डबा दिला आणि त्यांच्याकडे असलेली चादर ही त्या व्यक्तीच्या अंगावर टाकून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
संबंधित निराधार व्यक्ती भुकेने व्याकुळ झाली होता. त्याची अवस्था पाहून बांगी यांनी त्याला स्वतःकडे जेवणाचा डबा दिला. हा सारा प्रकार परिसरातील नागरिकांनी पाहिला आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या माणुसकीच्या उचलेल्या पावलाकडे साऱ्यांनीच कौतुकाने पाहिले. पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीने अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे संबंधित निराधार व्यक्तीला उठणे देखील कठीण होते. मात्र परिस्थितीत पोलिसांनी स्वतःकडील डब्यातील चार घास त्याला भरून त्याला जेवण दिले. हा सारा प्रकार परिसरातील नागरिकांनी पहिला आणि अनेकांच्या डोळ्यातून खाकीन दाखवलेले माणुसकीचे दर्शन घडले. पोलीस म्हणजे वाईट दर्डावणारे आणि बरेच काही मात्र पोलिसांना माणुसकीचा झरा असतो हे या घटनेवरून निदर्शनास आले आहे.