Sunday, November 17, 2024

/

कॅम्प येथील निर्बंधित क्षेत्रात जाण्यासाठी नवा पर्याय

 belgaum

कॅम्प येथील कसाई गल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर येथील 3 कि. मी. परिघाचा भौगोलिक प्रदेश निर्बंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच आणखी 2 कि. मी.चा प्रदेश बफर क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तथापि आता नागरिकांना आपत्कालीन सेवेसाठी नवा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

आपत्कालीन सेवा देणारी सर्व वाहने हॉटेल मिलन नजीकच्या श्री गणेश मंदिर येथे थांबतील. या एकमेव ठिकाणाहून वाहनांचे आगमन व प्रस्थान होईल. आपत्कालीन वाहनांत खेरीज अन्य कोणत्याही वाहनास सिव्हील हॉस्पिटल नजीक थांबू दिले जाणार नाही. ज्या वाहनांना चन्नम्मा सर्कल येथून पिरनवाडीकडे जावयाचे असल्यास त्यांनी संगोळ्ळी रायण्णा सर्कल, अशोक सर्कल, जिजामाता चौक, देशपांडे पेट्रोल पंप, शनी मंदिर, कपिलेश्वर ओव्हर ब्रिज, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, आरपीडी क्रॉस, तिसरे रेल्वे गेटमार्गे पिरनवाडीला जावयाचे आहे.

केएलई हॉस्पिटलकडे जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांनी संगोळ्ळी रायण्णा सर्कल, एस.पी. ऑफीस, कृष्णदेवराय सर्कल (कोल्हापूर कत्री) मार्गे केएलईच्या दिशेने प्रस्थान करायचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.