भारतासह संपूर्ण जगात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगावातील यशवंत कास्टिंग या उद्योग समूहाने तयार केलेल्या अद्ययावत “डिसइन्फेक्शन चेंबर” अर्थात निर्जंतुकीकरण कोठडी दोन ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे आता याचा बराच फायदा नागरिकांना तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांना होणार आहे.
बुडा आयुक्त यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात कोणाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी दोन निर्जंतुकीकरण यंत्रे बसविण्यात आली आहेत तर सोमवारी आणखी दोन निर्जंतुकीकरण यंत्रे बसविण्यात येणार आहेत. यंत्रे अद्ययावत असून या दोन्ही यंत्रांचा खर्च 2 लाख 40 हजार रुपये इतका आहे. बुडाने त्याचे हस्तांतरण सिव्हिल प्रशासनाकडे केले आहे. या निर्जंतुकीकरण यंत्रांमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
बुडातर्फे आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरात या डीसइन्फेक्शन चेंबरचे कांही युनिट बसविले गेले.
बेळगावातील यशवंत कास्टिंग या कंपनीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खास निर्जंतुकीकरण कोठडी तयार केले. हॉस्पिटल मध्ये एकूण चार निर्जंतुकीकरण यंत्र बसविण्यात येणार आहेत. कार्बोनेट पॅनल्स आणि शीट्सने बनविण्यात आलेल्या या पारदर्शक कोठडीला दोन दरवाजे असून प्रवेशद्वारावर सॅनीटायझरची बाटली ठेवण्यात आली आहे.
सॅनिटायझरने हात धुऊन कोठडीत प्रवेश केल्यानंतर अॅटोमॅटिक सेन्सरद्वारे कोठडीतील निर्जंतुकीकरण प्रणाली कार्यान्वित होते. ही निर्जंतुकीकरण प्रक्रिया संबंधित व्यक्ती कोठडीतून बाहेर पडेपर्यंत सुरू राहते. त्यानंतर अॅटोमॅटिक सेन्सरद्वारे ती बंद होते. सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर सदर “डीसइन्फेक्शन चेंबर” अतिशय प्रभावी ठरणार असल्याचा दावा यशवंत कास्टिंगचे वीरधवल उपाध्ये यांनी केला आहे. रविवार पासून या निर्जंतुकीकरण यंत्राला सुरुवात झाल्याने अनेक आतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यशवंत कास्टिंगच्या डीसइन्फेक्शन चेंबरची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक माहिती सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाला दिली. डीसइन्फेक्शन चेंबरचे महत्त्व लक्षात घेऊन आता बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडातर्फे आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरात या डीसइन्फेक्शन चेंबर रविवारी दोन ठिकाणी बसविले आहेत तर आणखी दोन दरवाजामध्ये सोमवारी बसविण्यात येणार आहे. या निर्जंतुकीकरण यंत्रांमुळे डॉक्टर्स नर्स आणि तेथील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.