देशातील कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यासाठी कॉलेज रोड येथील अतुल पुरोहित स्वीट मार्टच्यावतीने अतुल पुरोहित यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीला 1 लाख 11 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे.
देशातील जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार असल्याने पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना कॉलेज रोडवरील अतुल स्वीट मार्टच्यावतीने अतुल पुरोहित यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 1 लाख 11 हजार रूपयांचा धनादेश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांच्याकडे सुपूर्द केला.
खासदार अंगडी यांच्या कार्यालयात जाऊन हा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी कन्नुभाई ठक्कर, जेठाभाई पटेल, संदीप पटेल, संतोष पुरोहित आदी उपस्थित होते.
अतुल पुरोहित यांचे कॉलेज रोडवर मिठाई दुकान आहे ते अनेक सामाजिक कार्यांना देखील मदतीसाठी नेहमी तत्पर असतात.बेळगावच्या क्षत्रिय घांची राजस्थानी समाजा नंतर अतुल पुरोहित यांनी देखील पी एम ओ मदत देऊ केली आहे