संपूर्ण देशात लॉक डाऊन परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे सामाजिक व आर्थिक फटका सरकारला सोसावा लागत आहे. ही बाब इतकी गंभीर आहे की यापुढे त्याचे परिणाम नागरिकांना दिसून येतील. मात्र लॉक डाऊन मुदत वाढविल्याने लॉक इन साठीही सरकार प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काहींना दिलासा मिळत असला तरी यामध्ये भरपूर अटी घालण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत बेळगाव हे रेड झोनमध्ये असल्याने येथे हे उद्योग व्यवसायांना लॉक इन करण्यात येणार का? असा सवाल अंतर्मुख करणारा आहे. अशा परिस्थितीत जान है तो जहाँ है अशीच अवस्था बेळगावकर यांची झाली आहे.
14 एप्रिल रोजी लॉक डाऊनची मुदत संपणार या आशेवर बेळगावकर होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी यामध्ये वाढ करून ती 30 एप्रिल पर्यंत केले आहे. मात्र 16 एप्रिल पासून लॉक इन करण्याचा प्रयत्नही सुरू असणार आहे. या लॉक इन काळात काही कारखाने दुकानदार तसेच इतर व्यवसायांना सूट देण्याचे ठरविण्यात आले आहे. मात्र ज्या कारखान्यात अथवा दुकानात जे कामगार असतील त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आणि काम करताना सुरक्षित अंतर ठेवूनच काम करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे संबंधित कामगारांची व्यवस्था त्या त्या व्यवसायाची निगडित असलेल्या मालकांची असणार आहे.
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे याबाबत चर्चा केली आहे. या व्हिडीओ कॉन्फरन्स नंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी लॉक इन बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. लॉक इन काळात सुरक्षित अंतर आणि इतर अटी लावण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री लॉक इन द्वारे अर्थव्यवस्था राखण्यास मदत होईल आणि बेरोजगारांना काम मिळेल या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले आहे. मात्र याला बेळगावातून आता किती प्रतिसाद मिळतो ते पाहण्याची गरज आहे.
सध्या राज्यात कोरोना संबंधी तीन टप्पे करण्यात आले आहेत. यामध्ये बेळगावात 14 पोजीटिव्ह रुग्ण आहेत बेळगाव रेड झोनमध्ये आहे. तर ज्या ठिकाणी कमी कोरोना संख्या आहे त्यांना ऑरेंज आणि त्यानंतर ज्या ठिकाणी काही संख्या नाही त्यांना ग्रीन असे टप्पे देण्यात आले आहेत. सध्या बेळगावची परिस्थिती पाहता रेड झोन मध्ये असल्याने याठिकाणी लॉक इन होईल का हा देखील प्रश्न गंभीर आहे. जोपर्यंत बेळगाव ग्रीन टप्प्यात येत नाही ही तो पर्यंत येथे उद्योग व्यवसायांना बंदी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच बेळगावचे अवस्था सध्या जान है तो जहाँ हे अशीच झाली आहे.