संपूर्ण देश कोरोनाशी झुंजत असताना दुसरीकडे अनेक संस्था या काळात समाजहित जपण्याकडे अधिक लक्ष देत आहेत. मात्र आपले कर्तव्य आणि सामाजिक भान ठेवण्यासाठी पोलीस सरसावू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू गरजूंना वितरण केले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे त्यांनी गोरगरिबांना साहित्य वितरण केले आहे. या त्यांच्या कार्याचे अभिनंदन करावे तितके कमीच असल्याचे बोलले जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे आणि नेचर क्लब यांच्या सहकार्यातून धीरज शिंदे यांनी साहित्य वितरण केले आहे. घरोघरी जाऊन गरजूंना हे साहित्य वितरण केले आहे. महाद्वार रोड पहिला प्रवास येथे असणाऱ्या गरीब व गरजू नागरिकांना साहित्य वितरण केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संपूर्ण देश कोणाची झुंजत असताना आपले कर्तव्य आणि सामाजिक भान ठेवून धीरज शिंदे यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. त्यांच्या या कार्यात शिवाजी पार्क युवक मंडळ यांनी मोठे सहकार्य दिले आहे. त्यांच्या सहकार्याबद्दल धीरज शिंदे आणि त्यांचे आभार मानले आहेत.