कोरोनाने सध्या देशात धुमाकूळ घातला असून अनेक जण दानशूर व्यक्ती अशावेळी मदत करण्यासाठी पुढे येऊन आपल्या परीने पंतप्रधान निधी,मुख्यमंत्री निधीला देणगी देत आहेत.बेळगावचे उद्योजक बाळासाहेब पाटील आणि पाटील परिवार देखील मदतीसाठी पुढे आला आहे.
बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब पाटील यांनी पंतप्रधान कोरोना परिहार निधीला एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.बाळासाहेब पाटील आणि बंधूंच्या पॅटसन ग्रुपतर्फे ही भरीव देणगी दिली आहे.
यापूर्वीही राज्यात,देशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पॅटसन ग्रुपतर्फे वेळोवेळी भरीव देणग्या दिलेल्या आहेत.
देश,राज्य संकटात असताना,नैसर्गिक आपत्ती आलेली अष्टताना प्रत्येकाने पुढे येऊन आपल्या परीने निधी देणे आवश्यक आहे.सगळ्या गोष्टी सरकारला करणे शक्य नाही त्यामुळे धनिकांनी अशा वेळी पुढे येऊन पंतप्रधान निधी,मुख्यमंत्री निधीला देणगी देण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया उद्योजक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे.