कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन होम काॅरन्टाईनसाठी बेळगाव शहरातील चार हॉटेल्समधील एकूण 80 खोल्या आरक्षित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी दिला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी शहरातील काही ही हॉटेल्स च्या खोल्या भाड्याने घेऊन त्याठिकाणी संशयित रुग्णांसाठी होम काॅरन्टाईनची (घरगुती विलगीकरण) व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्यमबाग येथील होटेल उत्सव, काँग्रेस रोडवरील हॉटेल सुखसागर, खानापूर रोडवरील हॉटेल न्यू उदय भवन आणि कपिलेश्वर रोड येथील न्यू सूर्या यात्री निवास या चार हॉटेल्समधील एकूण 80 खोल्या होम काॅरन्टाईनसाठी आरक्षित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबत संबंधित हॉटेल मालकांना आदेशाची प्रत धाडण्यात आली आहे.
नुकताच मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी या चारही हॉटेल्सना भेट देऊन 2 एप्रिल रोजी रात्री पर्यंत चारी हॉटेल ताब्यात देण्याच्या सूचना केल्या होत्या त्या नुसार शुक्रवार पासून या चार लोजिंग मध्ये होम क्वांरंटाइन वर उपचार केले जाणार आहेत.न्यु उदय भवन च्या 32 उत्सव च्या 20 इतर अश्या 80 खोल्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत.
बेळगाव परिसरातील समशीतोष्ण वातावरण लक्षात घेऊन सदर चार हॉटेल्समधील अटॅच स्वच्छतागृह असणाऱ्या एकुण 80 नॉन एसी खोल्या होम काॅरन्टाईनच्या दृष्टिकोनातून ताबडतोब सुसज्ज केल्या जाणार आहेत. तसा आदेश आरोग्य खात्यासह जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला देण्यात आला आहे. शहरातील हॉटेल्समधील खोल्या आरक्षित करण्याचा जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय लक्षात घेता बेळगाव जिल्ह्यातील संशयित कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार हे निश्चित आहे.