देशव्यापी लॉक डाऊनमुळे बेळगावात स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेल्या एका राजस्थानी व्यक्तीच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याला त्याच्या गावी रवाना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला राजस्थान सरकारची बोलणी करावी लागल्याची आणि त्यानंतर त्या व्यक्तीला राजस्थानला जाण्यास परवानगी देण्यात आल्याची घटना रविवारी घडली.
देशव्यापी लाॅक डॉऊनमुळे नेहरूनगर येथील वस्तीगृहात स्थानबद्धतेत ठेवलेल्या राजस्थान येथील एका व्यक्तीच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. त्याची माहिती त्याने महापालिका अधिकाऱ्यांना घेऊन मला राजस्थानला पाठवण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली. महापालिका अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकार्यांना याबाबतची माहिती दिली. तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी राजस्थान सरकारशी चर्चा करून त्या व्यक्तीला राजस्थानमध्ये प्रवेश देण्याबाबत रीतसर परवानगी घेतली. तसेच संबंधित व्यक्तीला राजस्थानला जाण्यास परवानगी दिली.
सध्या राजस्थानला जाण्यासाठी खाजगी वाहन हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. त्यासाठी भाडे आकारणीही जास्त होणार होती. तथापि त्या व्यक्तीने 30 हजार रुपये इतके भाडे रक्कम देण्याची तयारी दाखविली त्यामुळे एक वाहन भाडेतत्त्वावर घेऊन प्रशासनाकडून त्या व्यक्तीला राजस्थानला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.