बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वाढता आलेख वाढतच आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी कोरोना बाधितांची संख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे तर अजूनही ही 243 अहवाल प्रयोगशाळेतून येणे बाकी असल्याने आणखी किती पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील याकडे सार्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 656 नमुन्यांपैकी 345 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर 36 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. या अहवालाने तर संपूर्ण जिल्ह्याचे झोप उडवली असून यापुढे दक्षता घेऊनच बाहेर पडण्याची गरज निर्माण झाली आहे.
दिल्ली येथील निजामुद्दीन धर्मसभेत जाऊन आल्यानंतर आरोग्य खात्याने काहींच्या तपासणीला सुरुवात केली आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात वाढतह गेली. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या 36 वर पोहोचली असली तरी बेळगाव तालुक्यात मध्ये देखील हा आकडा डबल अंकी झाला आहे. त्यामुळे आता तालुक्यात अति दक्षता घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
गुरुवारी आलेल्या अहवालामुळे बेळगाव तालुक्यासह जिल्ह्याची धाकधूक वाढली आहे. अशा परिस्थितीत अजूनही 243 अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे त्यामध्ये किती पॉझिटिव्ह आणि किती निगेटिव्ह हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असले तरी धास्ती मात्र लागून राहिली आहे. हे अहवाल कधी येतील याकडेच आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.