कोरोना पोजिटिव्ह बाबत बेळगाव जिल्ह्याने पन्नाशीचा आकडा पार केला आहे. शनिवारी सकाळच्या बुलेटिन मध्ये हिरेबागेवाडीचे सहा जण पोजिटिव्ह आढळले आहेत. या संख्यने हिरेबागेवाडी 20 पार हा आकडा पार झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सहा रुग्णाची भर पडली आहे.आता बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने अर्धशतक पार केले आहे.
पी 128 या हिरेबागेवाडीच्या दिल्ली रिटर्न कोरोना बाधित रुग्णाच्या दुय्यम संपर्कात आलेले सहा रुग्ण असल्याची माहिती देखील बुलेटिन मध्ये देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 51 झाली आहे.हे सहा कोरोना रुग्ण हिरेबागेवाडी येथील आहेत.यामध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.45,38, वयाचे पुरुष आणि 80,55,42 आणि 29 वयाच्या महिला आहेत.
कर्नाटक राज्य सरकारने शनिवारी दुपारी 12 वाजता जाहीर केलेल्या कोरोना माध्यान प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार 24 एप्रिल सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शनिवार 25 एप्रिल दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये 15 जणांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 489 झाली असून यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 153 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी येथील 6 जणांसह बेंगळूर शहरातील 6 आणि मंड्या, चिकबळ्ळापूर व बंटवाला मंगळूर येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.
हिरेबागेवाडी येथील सहा रुग्णांमुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 51 झाली आहे. हिरेबागेवाडी येथे आढळून आलेल्या 6 कोरोना बाधितांमध्ये 2 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. हिरेबागेवाडी येथील पी-482 (45 वर्षे)आणि पी-483 (38) हे दोन पुरुष तसेच पी-484 (80), पी-485 (55), पी-486 (42) व पी-487 (39 वर्षे) या चार महिला पी-128 या दुय्यम रुग्णाच्या (सेकंडरी कॉन्टॅक्ट) संपर्कात आल्याने कोरोनाग्रस्त बनले आहेत.