बेळगावात के एल ई हॉस्पिटल समोर आय सी एम आर केंद्रात कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचे काम अहोरात्र सुरू आहे.प्रयोगशाळा उभारणीचे आणि ट्रायल घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
गुरुवारपासून या प्रयोगशाळेत संशयित कोरोना रुग्णाचया स्त्रावाची तपासणी सुरू केली जाण्याची शक्यता आहे.सध्या बेळगाव जिल्ह्यातील संशयित कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीसाठी बंगलोर आणि शिमोगा येथे पाठवले जात आहेत.
बेळगावातील प्रयोगशाळा सुरू झाल्यावर बेळगाव जिल्ह्यातील संशयित कोरोना रुग्णांचे नमुने येथेच तपासले जाणार आहेत.त्यामुळे सध्या शिमोगा आणि बंगलोरहुन अहवाल येण्याची प्रतीक्षा करावी लागते ती संपुष्टात येणार आहे.
सध्या ट्रायल बेस वर तपासणी सुरू असून गुरुवारी पासून बेळगावच्या लॅब मध्ये तपासणी होण्याची शक्यता आहे.