बेळगाव येथील दोघा भामट्या पत्रकारांनी धारवाड येथे जाऊन एका कारखानदाराला धमकावून 25 हजार रुपयाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पत्रकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. धारवाड येथील ग्रामीण पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे.
अनवर के जमादार आणि निजाम अब्दुल पठाण अशी अटक करण्यात आलेल्या दोघां भामट्यांची नावे आहेत. त्यांनी बेलूर औद्योगिक क्षेत्रातील बीएमएन अॅग्रो फूडस भेट दिली आणि तेथील कारखान मालकाकडून पंचवीस हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यामुळे कारखानदारांनी पोलिसात तक्रार नोंदवली व त्यांना अटक करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील जम्मू आणि काश्मीर येथील 24 × 7 न्यूज चॅनेलचे वार्ताहर आहोत असे सांगणाऱ्या अनवर के. जमादार आणि जेएमआर चॅनेलचे पत्रकार निजाम अब्दुलसाब पठाण यांनी उद्योजकांना धमकावून 25 हजार रुपयांची मागणी केली होती. ते बेळगाव वरून धारवाडला दुचाकी घेऊन गेले होते. एका लोणच्याच्या कारखानदाराला धमकावून पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती. लॉक डाऊन काळात त्यांनी हा प्रवास करून नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
धारवाड येथील गरगचे पीएसआय प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड ग्रामीण पोलिस निरीक्षक एस.सी. पाटील यांच्या पुढाकारातून त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख यांनी एका पत्रकाद्वारे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या प्रकारामुळे पत्रकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली असून अनेक भामट्या पत्रकारांना अटक करावी अशी मागणी होत आहे.