सकाळी लॉक डाऊनच्या बंदोबस्ताला जाताना दुचाकीवरून पडल्याने पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे. वडगांव येथील येळ्ळूर रोड के एल ई समोर हा अपघात घडला आहे.
घराकडून पोलीस स्थानकाला जात असतेवेळी दुचाकी स्लिप झाली त्यात पी एस आय च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

गणाचारी असे मयत झालेल्या पी एस आय चे नाव असून ते खडे बाजार पोलीस स्थांनकात सेवा बजावत होते शनिवारी सकाळी त्यांची ड्युटी रेणुका हॉटेल जवळ लागली होती येळ्ळूर रोडजवळ त्यांचे घर आहे ते घरातून दुचाकी वरून ड्युटीवर निघाले होते त्यावेळी येळ्ळूर रोड के एल ई जवळ दुचाकी स्लिप होऊन गाडीवरून खाली पडले त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली रक्त स्त्राव झाला व घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला.
गणाचारी हे निवृत्त होण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी बाकी होता घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन भेट दिली.