कोरोना भीतीमुळे अनेक जण घराबाहेर पडण्यास धजत नाहीत. अशा परिस्थितीत अनेक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र दूध आणि भाजी विक्री सुरू राहण्यासाठी परवानगी आहे. अशा परिस्थितीत बेळगाव येथील दूध आणि भाजी घेऊन जाणारे गोव्यावरून परतताना दारूच्या बाटल्या घेऊन येत आहेत. अशांनी आता सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण अशा वाहनांमध्ये दारू सापडल्यास ती वाहने जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे वाहन प्रिय की दारू हे आता त्यांचे त्यांनी पहावे असा सल्लाही जाणकारांनी दिला आहे.
काही ही तोडक्या-मोडक्या पैशांसाठी बरेच जण गोव्यावरून परत येताना आपल्या भाजी किंवा दुधा वाहतूक करणाऱ्या वाहनातुन दारूच्या बाटल्या लपवून त्या बेळगावकडे आणत आहेत. मात्र कणकुंबी तसेच इतर परिसरातील नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याने कडक तपासणी करूनच वाहने सोडण्यात येत आहेत. पोलिसांनी ज्या वाहनातून दारू आणत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरु केले आहे. त्यामुळे यापुढे दारू आणताना थोडा विचार करा आणि नंतरच दारू आणा असे असे बोलले जात आहे.
गोवा बनावटीची दारू बेळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात खपविण्यात येते. त्यामुळे अनेकदा अशा वाहणातूनच दारू बेळगाव येथे आणतात. सध्या कोरोना संकट उद्भवले यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र अजूनही काही भाजीविक्रेते आणि दूध विक्रेते आपल्या वाहनातून दारू आणत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवून या वाहनातून दारू किंवा दूध आणताना दारू सापडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
लॉक डाउन काळात मद्याची दुकाने बंद असल्याने अनेक जण गोव्यावरून दारू पुरवठा करत असल्याचे दिसून येत आहे. एका बाटलीमागे पैसे अधिक मिळतात या आशेवर असे धंदे करणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसणार आहे. कारण पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवून वाहनाच्या प्रत्येक कोपरा न् कोपरा तपासण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे दूध आणि भाजी खरेदी विक्री करणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. यापुढे तशी वाहने सापडल्यास ती वाहने जप्त करण्यात येणार आहेत, असा इशाराही देण्यात आला आहे.