संगमेश्वर नगरमधील अस्मा कॉलनीत आणि अमनगर येथे कोरोनाचे पॉजीटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णाच्या निवसस्थानापासून 200 मीटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे.कंटेन्मेंट झोन नंतर पाच किलोमीटर परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
कंटेन्मेंट झोन मधील कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरातून बाहेर पडता येणार नाही तर बाहेरील व्यक्तीला आत जाता येणार नाही.कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.या झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच प्रवेशद्वार असणार आहे.
कंटेन्मेंट झोन मधील सगळ्या नागरिकांनी होम क्वारंटाईनचे पालन करणे आवश्यक आहे.पाच व्यक्ती एकत्र येणे,उत्सव ,समारंभ साजरे करणे यावर बंदी आहे.आरोग्य खात्याचे कर्मचारी देतील त्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
कंटेन्मेंट झोनमधील रहिवाशीना जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्यात येणार आहेत. तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
संमेश्वर नगर येथील अस्मा कॉलनी आणि अमननगर अगोदर कॅम्प पिरनवाडी येळ्ळूर बेळगुंदी आणि हिरेबागेवाडी देखील कंटेमेंट प्रदेश म्हणून जाहीर झाले आहेत.बेळगावातील जनतेला आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे