बेळगाव जिल्ह्यातील आणि वेगवेगळ्या राज्यांना भाजी तसेच इतर साहित्य विक्री करणाऱ्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये लॉक डाऊन मुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. ही समस्या सोडविण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम राबविला. मात्र हा कार्यक्रम काही मोजक्याच जणांना राबवल्याचा आरोप सध्या होत आहेत. त्यामुळे एपीएमसीच्या कारभाराबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे.
एपीएमसीमध्ये चार मार्केट आहेत. त्यामधील एका दुकानांमध्ये हमाल दिवानजी आणि मालकांना ओळखपत्र देण्याचे काम सुरू होते. मात्र याबाबत काहिनी जाणून-बुजून ओळखपत्र देत नसल्याचा आरोप होत आहे. सकाळपासून रांगेत उभे असलेल्यांना डावलून नको त्यांना ओळखपत्र देण्याचे काम तेथील प्रशासनाने केले आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
मंगळवारी सकाळपासून टोकन घेऊन रांगेत उभे असलेले अनेक नागरिक दुपारी एक पर्यंत उभेच होते. त्यानंतर अचानकपणे तेथील प्रशासनाने ओळखपत्र देण्याचे काम बंद झाले असून दुपारनंतर या असे सांगितले. त्यानंतर दुपारी गेल्या वर पुन्हा पाच पर्यंत रांगेत उभे असलेल्या ना ओळखपत्र देण्याचे काम बंद झाले आहे, असे सांगून त्यांची दिशाभूल केली आहे. याबाबत काही तक्रार केली असता हा व्यापारी अधिक बोलतो त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा असे म्हणून दादागिरी करण्याचा प्रकार घडला त्यामुळे अनेक व्यापारी हमाल आणि मालकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.
टोकन देऊन देखील ओळखपत्र न दिल्याने मोठी गदारोळ माजला आहे. या प्रकाराने एपीएमसी प्रशासनाच्या आंधळ्या कारभाराचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. करण्याच्या पार्श्वभूमीवर ओळखपत्र देण्याचे काम एपीएमसी हाती घेतले होते. मात्र त्यांच्यात भेदभाव करून अनेकांना ओळखपत्र पासून वंचित ठेवण्याचे काम ही करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे यापुढे तरी सर्वांना समान कायदा लागू करावा अशी मागणी होत आहे.