बेळगावात दोन कोरोना बाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्या दोघांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.या दोन कोरोना बाधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.यापैकी एक रुग्ण रायबाग कुडची येथील तर दुसरा रुग्ण हिरेबागेवाडी येथील आहे.
हिरेबागेवाडी येथील 20 वर्षीय युवक(पी-128) दिल्ली मरकजला जाऊन आल्यावर त्याला कोरोनाची बाधा झाली होती या शिवाय कुडची येथील 40 वर्षीय इसमाला(पी-148) देखील दिल्लीला जाऊन आल्यावर लागण झाली होती आता दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत.हिरेबागेवाडीचा युवक 1 एप्रिल रोजी तर रायबाग कुडची इसम 2 एप्रिल रोजी क्वांरंटाइन झाले होते अनुक्रमे 3 व 4 एप्रिल रोजी पोजिटिव्ह झाले होते 21 एप्रिल रोजी ते निगेटिव्ह झाले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील 42 रुग्णांपैकी तीन रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचा देखील आकडा वाढत आहे.कर्नाटक राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये काल सायंकाळपासून आणखी सात जणांची भर पडल्यामुळे राज्यातील करुणा बाधित यांची एकूण संख्या 415 झाली आहे. यापैकी 114 जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.