बेळगावात कोरूना बाधितांची संख्या वाढत असताना काही दिलासादायक घटनाही घडत आहेत. रायबाग कुडची येथील एक रुग्ण आता पूर्णता बरा झाला आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलने घरी जाऊ दिले आहे. या घटनेमुळे नागरिकांमधील भीती काही प्रमाणात दूर झाली आहे.
बेळगावात एकूण 45 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामधील आता चौघेजण बरे झाले आहेत तर एका 80 वर्षे वृद्धेचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या रुग्णाला डिस्चार्ज देऊन त्याला घरी जाऊ देण्यात आले आहे.
संपूर्ण देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत असताना बेळगावात मात्र समाधानकारक चित्र आढळून आले आहेत. शुक्रवारी दोन लहान मुलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण व्यक्त होत असतानाच सायंकाळी मात्र एका पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासादायक बाब आहे.
आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात एकूण 45 जणांना याची बाधा झाली आहे. तर या मधील एका 80 वर्षे वृद्धेचा मृत्यू झाला आहे. चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे. हा महाभयंकर रोग निवारण्यासाठी डॉक्टर्स नर्स तसेच पोलिस अधिकारीही प्रयत्न करत आहेत. नागरिकांना घरी राहण्याचा सल्ला देत आहे. बेळगावात पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह आढळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.