फ्लावरचा पाला खाल्याने अत्यवस्थ झालेल्या सराफ गल्ली चार म्हशींची पहाणी राज्य अनिमल वेल्फेअर बोर्डाच्या सदस्या सोनाली सरनोबत यांनी पशु संगोपन अधिकाऱ्यां सोबत केली.
भाजीपाल्यातील रसायनमिश्रित फ्लॉवरचा पाला खाल्ल्याने बुधवारी सराफ गल्लीत एक म्हैस दगावली तर अन्य 4 म्हशी अत्यवस्थ झाल्या होत्या याची माहिती मिळताच त्यांनी गुरुवारी अत्यवस्थ म्हशींची पहाणी करत पशु संगोपन अधिकाऱ्यांना उपचार सुरू करायला लावले.
सराफ गल्ली येथील गवळी ज्ञानेश्वर सुबराव चौगुले यांच्या मालकीच्या दुभती पंढरपुरी म्हैस मरण पावल्यामुळे गवळ्याचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या म्हैस मालकांना धीर देत सरनोबत यांनी फ्लावर सारखा कोणताही पाला खायला घालू नये योग्य काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी हभप शंकर बाबली महाराज शेतकरी उपस्थित होते.
सध्या चाऱ्याचा तुटवडा आहे. तेंव्हा शेतकरी आणि गवळी लोकांनी आपल्या जनावरांना भाजीपाला घालताना तो विषारी रसायनमिश्रित नाही ना? याची प्रथम शहानिशा करावी. त्यानंतरच तो भाजीपाला जनावरांना खाण्यास द्यावा, अशी सूचना याप्रसंगी डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली तसेच गवळी ज्ञानेश्वर चौगुले यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले.
ज्ञानेश्वर चौगुले यांच्या बाबतीत घडलेल्या या दुःखद घटनेमुळे सराफ गल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच लॉक डाऊनच्या काळात ही घटना घडली असल्यामुळे याला अप्रत्यक्षरित्या शासनच जबाबदार आहे तेव्हा ज्ञानेश्वर चौगुले यांना ताबडतोब नुकसानभरपाई दिली जावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून केली जात आहे.