कोरोना संबंधित बेळगावातून बंगळुरूच्या प्रयोग शाळेत पाठवलेले सर्व रुग्णांचे रक्ताचे नमुने निगेटिव्ह आले आहेत एकूण 27 नमुने पाठवण्यात आले होते आज सहा रिपोर्ट मिळाले असून ते निगेटिव्ह आहेत अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी दिली आहे.
गुरुवारी रात्री प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बोमनहळळी यांनी आता पर्यंत पाठवलेले सर्व नमुने निगेटिव्ह असल्याचे स्पष्टीकरण केले आहे त्यामुळे बेळगावसाठी गुरुवारीची ही दिलासा दायक बातमी आहे.
जनतेने सतर्कता बाळगून सरकारला सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन देखील डी सी बोमनहळळी यांनी केले आहे.राज्यात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा वाढत असताना बेळगावात मात्र एकही कोरोना पोजीटिव्ह रुग्ण आढळला नाही ही जनतेसाठी चांगली बातमी आहे.