कृषी उत्पादने विक्री,वाहतूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या.वस्तूंची वाहतूक करण्यासाठी कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.फळे,भाजीपाला आदी शेतकऱ्याच्या उत्पादनाची वाहतूक,विक्री सुरळीत होण्यासाठी उपाय योजना करा.भाजीपाला आणि फळे यांचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन कृषी मंत्री बी सी पाटील यांनी केले आहे.
सोमवारी बेळगावात सर्किट हाऊस मध्ये कृषी व अन्य खात्याच्या अधिकाऱ्यां सोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
भाजीपाला, फळ विक्री व्यवस्थित व्हावी याकडे लक्ष द्या.खते, बी बियाणे,कृषी अवजारे,कीटकनाशके यांची दुकाने सुरू ठेवावीत.पाऊस पडला की शेतकऱ्याला बी बियाणे ,खत आदि लागणार आहे.त्यामुळे शेतकऱ्याला आवश्यक वस्तुंचा साठा दुकानात उपलब्ध असेल याची काळजी घ्या असेही मंत्री पाटील म्हणाले.
राज्यात कोंबड्याना होणारा फ्लू याची नोंद कुठेच झाली नाही त्यामुळे चिकन खाऊ शकता चिकन खाल्याने कोणताही त्रास होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले या शिवाय व्यापार करण्यास कोणत्याही वेळेचे बंधन लादू नये अश्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्ह्याच्या सीमाना लागून असलेल्या अन्य राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा झाली आहे.लवकरच कृषी उत्पादने अन्य राज्यात पाठविण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री सतीश जारकीहोळी आमदार अनिल बेनके, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे आदी उपस्थित होते.