Sunday, January 12, 2025

/

लॉक डाऊन नंतर आर्थिक संकटाचे आत्मचिंतन ही काळाची गरज – तेंडुलकर

 belgaum

लाॅक डाऊनमुळे आपल्या देशात संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली असून बेळगावही याला अपवाद नाही. तेंव्हा लॉक डाऊनच्या काळात येऊ घातलेल्या आर्थिक संकटाचा मुकाबला कसा करायचा याबाबत आत्मचिंतन करणे ही काळाची गरज आहे, असे मत सुप्रसिद्ध उद्योजक सतीश तेंडुलकर यांनी व्यक्त केले.

कोरोना प्रादुर्भाव आणि जारी असलेला लॉक डाऊन यासंदर्भात “बेळगाव लाइव्ह”शी बोलताना उद्योजक सतीश तेंडुलकर यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. प्रारंभी तेंडोलकर यांनी 10 लाख वाचक संख्येचा टप्पा पार केल्याबद्दल बेळगाव लाईव्हचे अभिनंदन केले 10 लाख वाचक संख्येचा टप्पा पार करणे ही खरोखर कौतुकास्पद बाब असून अवरीत कठोर परिश्रम आणि तळागाळातील लोकांची असलेली जाण हेच या यशाचे गमक असल्याचे मत सतीश तेंडुलकर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले गेल्या महिन्याभरापासून लॉक डाऊनच्या माध्यमातून आपण समस्त बेळगावकर आत्तापर्यंत कोरोनाशी यशस्वी लढा देत आलो आहोत. आपण हा लढा निश्चितपणे जिंकणार यात तिळमात्र शंका नाही. लॉक डाऊनमूळे आपल्या देशासह संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. याला बेळगाव देखील अपवाद नाही. तेंव्हा लॉक डाऊनच्या काळात भविष्यातील आर्थिक संकटाचा मुकाबला कसा करायचा? याबाबत आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. यासाठी आतापासूनच खर्चावर नियंत्रण ठेवणे, काटकसरीने वागणे तसेच जी काही बचत आता अथवा गुंतवणूक केलेली असेल त्यांचे योग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे, असे मत तेंडोलकर यांनी व्यक्त केले.

आपण सणवार, उत्सव वारेमाप पैसा खर्च करून साजरे करत असतो. मात्र आता त्यावर स्वतःहून निर्बंध घालणे हे समाजासाठी हितकारक ठरणार आहे. उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी देखील सद्यपरिस्थितीत अन्य विकल्प अवलंबले पाहिजेत. जेणेकरून भारताला महासत्ता बनविण्याचे जे स्वप्न आपण पहात आहोत ते खरोखर सत्यात उतरेल असे सांगून उद्योजक सतीश तेंडुलकर यांनी शेवटी समस्त शहरवासियांना “घरी रहा, सुरक्षित रहा” हा संदेश दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.