लाॅक डाऊनच्या पार्श्वभूमीवर बेळगाव बार असोसिएशनतर्फे वकिलांच्या सहाय्यकांना अर्थात ज्युनियर्सना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्याचा जो उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला ॲड. श्यामसुंदर पत्तार यांनी आर्थिक सहाय्य देऊ केले.
सध्याच्या लाॅक डाऊनमुळे न्यायालये बंद आहेत. परिणामी वकिलांच्या सहाय्यकांचे अर्थाजन बंद झाले असून ही ज्युनियर वकील मंडळी सध्या अडचणीत आली आहेत यासाठी या सहाय्यकांना बार असोसिएशनतर्फे दोन महिन्याचे जीवनावश्यक साहित्य वितरित केले जात आहे.
या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी शुक्रवारी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ यांच्याकडे अॅड. श्यामसुंदर पत्तार यांच्या पत्नीने मदतीचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी बेळगाव बार असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. सी. टी. मजगी, सरचिटणीस ॲड. आर. सी. पाटील, ॲड. शिवपुत्र फटकळ, ॲड मारुती कामाणाचे ॲड हन्नीकेरी, ॲड. शंकर गणमुखी, ॲड. पी. सी. मोतीमठ, ॲड. प्रमिळा हप्पन्नावर आदी उपस्थित होते.